महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला, जिंकली एकदिवसीय मालिका - australia

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला एकदिवसीय मालिकेत घेतला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याची मालिका 2-1 ने जिंकली.

wi-vs-aus-australia-beat-west-indies-by-6-wicket-in-3rd-odi-and-win-serie 2-1
WI vs AUS : ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला, जिंकली एकदिवसीय मालिका

By

Published : Jul 27, 2021, 3:32 PM IST

बार्बाडोस -ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला एकदिवसीय मालिकेत घेतला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याची मालिका 2-1 ने जिंकली. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तेव्हा वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली होती. पण अखेरच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला.

तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा डाव त्यांच्याच अंगलट आला. एविन लुईस वगळता एकही वेस्ट इंडिज खेळाडूला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा यशस्वी सामना करता आला नाही. वेस्ट इंडिजचा संघ 45.1 षटकात 152 धावांवर सर्वबाद झाला. यात लुईसने 55 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 43 धावांत 3 गडी बाद केले. तर अॅश्टन अगर आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

वेस्ट इंडिजने दिलेले 153 धावांचे सोपे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 30.3 षटकात 6 गडी राखत पूर्ण केले. यात मॅथ्यू वेडने नाबाद 51 धावांची खेळी केली. तर अगर 19 धावांवर नाबाद राहिला. नाबाद 19 धावां आणि 2 विकेट घेणारा अगर सामनावीर ठरला. तर मिचेल स्टार्कला मालिकावीरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टार्कने 3 सामन्यात 11 गडी बाद केले. त्याने 4.30 च्या इकॉनमीने एकदा 5 गडी बाद करण्याची किमया साधली.

हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन पदकापासून एक पाऊल दूर

हेही वाचा -Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details