मुंबई:चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत ( CSK captain Mahendra Singh Dhoni ) आला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान फलंदाजीला येण्यापूर्वी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी आपली बॅट चावताना ( Dhoni biting his bat ) दिसत आहे. धोनी फलंदाजीपूर्वी असे का करतो, याचा खुलासा एका भारतीय खेळाडूने केला आहे.
धोनी फलंदाजीपूर्वी असे का करतो याचा खुलासा भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने ( Revealed by Amit Mishra ) केला आहे. मिश्राने सांगितले की, धोनी आपली बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो. त्याने ट्विट करून लिहिले, जर तुम्ही विचार करत असाल की धोनी अनेकदा त्याची बॅट का चावतो. त्याला बॅट स्वच्छ ठेवायला आवडते म्हणून तो बॅटमधून टेप काढण्यासाठी असे करतो. तुम्ही एमएसच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघताना पाहिला नसेल.