कोलकाता : सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ( West Indies tour of India ) आहे. या दौऱ्यातील आता तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना पार पडला आहे. हा सामना भारतीय संघाने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (शुक्रवारी) खेळला जाणार आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्डच्या ( Kieron Pollard Captain of West Indies )नेतृत्वाखाली मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
चाहत्यांसाठी महत्वाच्या गोष्टी -
- भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (18 फेब्रुवारी) होणार आहे.
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर ( Eden Gardens Cricket Stadium ) खेळवला जाणार आहे.
- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
- तसेच हा सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे ठीक साडेसहाला नाणेफेक होईल.
- तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना पाहू शकता.
- तसेच लाइव स्ट्रीमिंगचा डिस्ने हॉटस्टारवर या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.