मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई येथे रविवारी रात्री साडे सात वाजता सुरु होईल. या मोसमात दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचबरोबर मयंक अग्रवालच्या ( Mayank agarwal ) नेतृत्वाखाली पंजाबला मागील सामन्यातील पराभव विसरून पुनरागमन करायला आवडेल.
चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) चा संघ इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. पण गतविजेत्याला परत आणण्यासाठी कर्णधार रवींद्र जडेजा आपल्या खेळाडूंनी रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावी अशी इच्छा आहे. CSK च्या मोहिमेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून पराभूत झाल्यानंतर, त्यांना लखनौ सुपर जायंट्स (LSG) या नवीन संघाकडून पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या सामन्यात फलंदाजी अपयशी ठरले, तर दुसऱ्या सामन्यात दव पडल्याने गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्यांना 200 हून अधिक धावांचा बचाव करण्यात अपयश आले.
निकालात नाणेफेक महत्त्वपूर्ण -सामन्याच्या निकालात नाणेफेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने, दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे संघांनी लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे सीएसकेला आशा आहे की, ते ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्यास अधिक चांगले तयार आहेत. एलएसजीच्या पराभवानंतर जडेजा म्हणाला, या टप्प्यात दव महत्त्वाचा भाग असेल. नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करणे पसंत कराल. खूप दव होते, बॉलही हातात येत नव्हता, ओल्या बॉलने सराव करावा लागेल.