हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) यांच्यातील वनडे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून (रविवार) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच हा सामना भारतीय संघाचा 1000 वा एकदिवसीय सामना आहे.
भारतीय संघ 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा जगातील पहिला देश आहे. तसेच केवळ ऑस्ट्रेलिया (958) आणि पाकिस्तान (936) यांनी आतापर्यंत 900 चा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला वनडे 48 वर्षांपूर्वी 1974 मध्ये लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. मात्र, त्यात त्यांचा चार गडी राखून पराभव झाला होता.
भारतीय संघ या ऐतिहासिक सामन्याचा साक्षीदार बनण्यासाठी सज्ज आहे. परंतु या सामन्यासाठी प्रेक्षकांची मैदानावर उपस्थिती नसणार आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका (Three-match T20 series in Kolkata) खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या 75 टक्के उपस्थिला परवानगी देण्यात आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi at the stadium) दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रेक्षेपण टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports 1, Star Sports 1 HD, Star Sports 1 Hindi, Star Sports 1 Hindi HD) वर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर देखील पाहता येणार आहे.