बारबाडोस: भारतीय संघाने दिलेले माफक आव्हान वेस्ट इंडिजने 4 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजापुढे टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. भारतीय संघ फक्त 181 धावा करु शकला. भारताने दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने 6 विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने कर्णधारपदाला साजेशी 63 धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
टीम इंडियाचे माफक आव्हान: टीम इंडियाने 40.5 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने 55 धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने 34 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. परंतु त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 90 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी अपयशी ठरले. एकाही फलंदाजाला 30 धावांच्या वरती धावसंख्या करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना मोटी आणि शेफर्ट यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.