हैदराबाद -आयपीएल 2022 सुरु ( IPL 2022 ) असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय किक्रेटमधून निवृत्ती घेतली ( Kieron Pollard Announced Retirement ) आहे. त्याने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
पोलर्डने सांगितले की, "मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघात खेळण्याचे माझे स्वप्न होते. गेल्या पंधरा वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आहे. पण, आता विचार करुन मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे."