बंगळुरू :भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी पार पडली. या मालिकेत भारताने श्रीलंका संघाला 2-0 ने क्लीन स्वीप दिला. ज्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आभासी पत्रकार परिषदेत ( Virtual Press Conference of Rohit Sharma ) आपल्या संघातील खेळाडूंबाबत प्रतिक्रिया दिल्या. ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल महत्वाचे वक्तव्य केले.
रिषभ पंत हा आपल्या आक्रमक शैलीमुळे ( Rishabh Pant aggressive style ) बऱ्याचवेळा आपली विकेट्स गमावून बसतो. परंतु सोमवारी रोहित शर्मा म्हणाला की, रिषभ मध्ये काही मिनिटात सामना बदलण्याची क्षमता आहे. त्याच्या या क्षमतेमुळे त्याच्या स्वाभाविक खेळाला स्वीकारायला तयार आहे. त्याचबरोबर रोहित म्हणाला, पंतला खेळपट्टीनुसार फलंदाजी करण्यास सांगितले आहे.
आभासी पत्रकार परिषदेत ( Virtual Press Conference ) बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "तो कसा फलंदाजी करतो हे आम्हाला माहीत आहे आणि एक संघ म्हणून आम्ही त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देऊ इच्छितो. पण त्याला सामन्यातील परिस्थिती आणि खेळपट्टीचाही विचार करण्यास सांगण्यात आले आहे. तो चांगल्या पद्धतीने खेळी करत पुढे जात आहे. तसेच तो परिपक्व देखील होत आहे. कधी-कधी तो असे काही शॉट का खेळतो. ज्यामुळे तुम्हाला डोक्याला हात लावावा लागते. पण तो खेळला म्हणून आपण त्याला स्वीकारावं. जसा तो खेळतो."