महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आम्हाला मजबूत भारतीय खेळाडूंची गरज होती आणि त्यांना खरेदी करण्यात आम्ही यशस्वी - राजस्थान रॉयल्सच्या मालकाचे वक्तव्य - IPL 2022 Updates

राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले ( Rajasthan Royals owner Manoj Badale statement ) यांनी एका प्रसिद्धीपत्रकात लिलावा बाबत मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, या वेळी आमचे लक्ष्य मजबूत भारतीय खेळाडूंना तयार करण्याचे होते.

RR
RR

By

Published : Feb 15, 2022, 6:04 PM IST

नवी दिल्ली - आयपीएल 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला पार पडल्यानंतर प्रत्येक संघातील खेळाडूंची नावे निश्चित झाली आहे. त्यानंतर आता राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले (Rajasthan Royals owner Manoj Badale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले त्यांची फ्रेंचायझी मजबूत संघ तयार करण्यात यशस्वी झाली आहे.

त्याचबरोबर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Bowler Joffra Archer ) संघात घेण्यात यश न आल्याने ते निराशाजनक असल्याची कबुली देखील, मनोज बदाले यांनी दिली. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून मुंबईने रविवारी बंगळुरू येथील आयपीएल लिलावात ( IPL auction in Bangalore ) आर्चरला ८ कोटी रुपयांना विकत घेतले ( Bought Archer for Rs 8 crore ). बदाले म्हणाले की त्यांची फ्रेंचायझी निश्चित लक्ष्यासह लिलावात गेली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना हवे ते साध्य करण्यात त्यांना यश आले.

बदाले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की या वेळी आमचे लक्ष्य मजबूत भारतीय खेळाडूंना तयार करण्याचे होते. अश्विन, चहल, करुण, सैनी, देवदत्त यांच्या रूपाने आम्ही हे करू शकलो. याशिवाय संजू आणि यशस्‍वी हे या संघाचे अगोदर पासूनच सदस्य आहेत.

ते पुढे म्हणाले, ''आमचे लक्ष्य नेहमी जागतिक पातळीची प्लेइंग इलेव्हन तयार करण्याचे असते. ते याच्यावरुन स्पष्ट होते की, आम्ही सुरुवातीच्या इलेव्हनसाठी अधिक पैसा वापरण्याचा ( More money use RR for XI) प्रयत्न केला. आम्हाला रॉयल्समध्ये पुन्हा पाहायला आवडेल असे परिचित चेहरे निवडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही काही महान आंतरराष्ट्रीय खेळाडू विकत घेतले आहेत आणि मी त्यांना संघाच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

आर्चरसारखा खेळाडू गमावल्याने निराश ( Manoj Badale disappointed to lose Archer ) झालो, मात्र परिस्थिती पाहता निर्णय घ्यावा लागल्याचे बदाले म्हणाले. तो म्हणाला, "गेल्या काही वर्षांपासून तो आमच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे आणि आमच्यासोबत त्याच्या खेळाचा दर्जाही वाढला आहे. पण जर आम्ही त्याला 9 कोटी रुपये देऊन आमच्याकडे ठेवलं असतं, तर आम्ही आता बनवलेली टीम बनवता आली नसती.''

रविवारी संपलेल्या दोन दिवसीय लिलावात रॉयल्सने 24 खेळाडूंना ( The Royals bought 24 players 89 ) कोटी पाच लाख रुपयांना विकत घेतले. नवदीप सैनी व्यतिरिक्त, संघात जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रेसी व्हॅन डेर ड्यूसेन आणि डॅरिल मिशेलसारखे अनुभवी खेळाडू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details