हैदराबाद :आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women ODI World Cup ) स्पर्धेला 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील भारत आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या अगोदर आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने एक व्हिडीओ शेअर ( International Cricket Council shared a video ) केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघ खुप आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला दिसत आहे.
आयसीसीने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये उपकर्णधार हरमनप्रीत कौर ( Vice Captain Harmanpreet Kaur ) भांगडा करताना दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात भांगड्याने होते. त्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणते, मला फक्त येवढेच करता येते. मी जिथे ही जाते, तेव्हा हे करते. आयसीसीने या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहले आहे, काही शानदार नृत्यासोबत हास्याचा एक खुराक. भारतीय कॅम्प आनंदाने भरलेला आहे.
तसेच या व्यतिरिक्त व्हिडीओ मध्ये यस्तिका भाटिया डांस करताना दिसत आहे. त्याचबरोबर भारताची स्टार सलामवीर फलंदाज स्मृती मंधाना ( Star batsman Smriti Mandhana ) आणि शेफाली वर्मा हंसताना खुप क्यूट दिसत आहेत. तसेच या व्हिडीओ मध्ये यांच्या व्यतिरिक्त झूलन गोस्वामी, मिताली राज, ऋचा घोष यांच्याबरोबर इतर खेळाडू ही दिसत आहेत.