मोहाली :फिरकीचा जादूगार शेन वार्नचे दोन दिवसापूर्वी 52 वर्षी निधन झाले. त्यानंतर आता भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) शेन वार्न सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2008 साली आयपीएल स्पर्धेत रविंद्र जडेजा जेव्हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता, तेव्हा शेन वार्न त्या संघाचा कर्णधार होता. त्याचा युवा खेळाडूवर विश्वास होता. त्यामुळे तो क्रीडा चाहत्यांमध्ये झटपट 'हिट' झाला.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला ( Rajasthan Royals IPL winners ) होता आणि जडेजाने 'फिनिशर'ची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो वॉर्नचा आवडता बनला, ज्याने त्याला 'द रॉकस्टार' असे टोपणनाव दिले. लेग-स्पिनच्या कलेला जीवदान देणाऱ्या वॉर्नचे शुक्रवारी वयाच्या 52व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने क्रिकेट जगताला मोठा धक्का ( A big blow to world of cricket ) बसला.