मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा वानखेडे स्टेडियमला देखील बसला आहे. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलं तर एका साईट स्क्रीनचेही नुकसान झाले आहे. सद्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर मुंबईत वादळी वारा सुरू होता. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग असल्याने समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या वानखेडे स्टेडियमचे देखील नुकसान झाले. स्टेडियमधील एका स्टँड थेट जमिनीवर कोसळला. तर बॅट्समनच्या एकाग्रतेसाठी महत्त्वाची असणारी साईट स्क्रिनही जमीनदोस्त झाली.