मोहाली :भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे शुक्रवार (4 मार्च) पासून खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय ( India won toss opt to bat घेतला आहे.
या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर या दोघांना भारतीय प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी रवींद्र जडेजा आणि आर आश्विनला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच हा सामना विराट कोहलीसाठी अत्यंत मह्त्वाचा आहे. कारण विराट कोहली आपल्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना ( Virat Kohli 100th Test match ) खेळत आहे.
पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी -
प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामी फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) 29 (28) धावा काढून बाद झाला. तसेच भारतीय संघाची धावसंख्या 80 असताना भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. मयंक अग्रवाल 33(49) धावा करुन बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने 26 षटकांच्या समाप्तीनंतर 109 धावा केल्या आहेत. त्यानंतर लंच ब्रेक झाला आहे. तोपर्यंत विराट कोहली 15 आणि हनुमा विहारी 30 धावांवर नाबाद आहेत.
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाची प्लेयिंग इलेव्हन -
भारत :रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरित अस्लंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया, लाहिरू कुमारा