मुंबई:यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) टी-20 क्रिकेटमधील आपल्या कारनामांमुळे प्रसिद्धी झोतात आला. पण अलीकडेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत 30 सामन्यांमध्ये 40.85 च्या सरासरीने 1920 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत बाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag ) मोठा दावा केला आहे.
मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या मालिकेत, 24 वर्षीय पंतने 120.12 च्या स्ट्राइक रेटने 185 धावा केल्या, ज्यामध्ये बंगळुरू येथील गुलाबी-बॉल कसोटीत 28 चेंडूतील अर्धशतकांचा समावेश होता. जो भारतीय फलंदाजाकडून लगावलेले सर्वात वेगवान अर्धशतक होते. सेहवाग म्हणाला, जर तो 100 हून अधिक कसोटी खेळला तर त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कायमचे नोंदवले ( Recorded forever in history books ) जाईल. केवळ 11 भारतीय क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केली आहे आणि प्रत्येकाला ती 11 नावे आठवत असतील.
स्पोर्ट्स 18 वर हिरोज शो ( Heroes show on Sports18 ) शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होईल. सेहवाग स्वतः कसोटी क्रिकेटमधील सर्वात स्फोटक खेळाडूंपैकी एक होता. त्याने 49.34 च्या सरासरीने 82.23 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 8586 धावा केल्या. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने आणि 104.33 च्या स्ट्राइक रेटने 8273 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅट अधिक लोकप्रिय आणि किफायतशीर होत असूनही, भविष्यात कसोटी क्रिकेट हे खेळाचे अधिक चांगले स्वरूप राहील असे सेहवागला अजूनही वाटत होते, हे आश्चर्यकारक नव्हते.