मोहाली :भारत विरुद्ध श्रीलंका संघात ( India v Sri Lanka ) कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना हा विराट कोहलीचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे. तो 100 वा कसोटी सामना किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा भारताचा बारावा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या देशाच्या किती खेळाडूंनी कसोटी सामन्याचे शतक पूर्ण केले आहे, ते जाणून घेऊया
विराट कोहली हा 100 वा कसोटी खेळणारा बारावा खेळाडू ठरला असून, तो विश्व कसोटी क्रिकेटमधील ( World Test cricket ) देखील 71 वा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आज खेळला जात असलेला कसोटी सामना विराटच्या जीवनातील सर्वात महत्वाचा सामना आहे. त्याचबरोबर विराट भारताचा बारावा खेळाडू आहे, तर जगातील कोणत्या देशातील किती खेळाडूंने हा कारनामा केला ते जाणून घेऊया.
भारतातील 12 खेळाडूंने 100 कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे 100 कसोटी सामने खेणाऱ्यांच्या यादीत भारत संघ तिसऱया स्थानी आहे. तसेच 100 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. या देशातील तब्बल पंधरा खेळाडूंनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. या संघातील 13 खेळाडूंना 100 कसोटी सामने खेळण्याच्या पराक्रम केला आहे.