मुंबई:आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या अगोदर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former captain Virat Kohli ) आरसीबी संघाबाबत एक प्रतिक्रिया दिली आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर तो एका नव्या ऊर्जेने खेळण्यासाठी उत्साहित आहे. 2021 च्या आयपीएल हंगामाच्या शेवटी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते.
कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला नवी ऊर्जा मिळाली आहे का, असे विचारले असता कोहलीने मंगळवारी आरसीबी बोल्ड डायरीजला ( RCB Bold Diaries ) सांगितले की, "मी नवीन उर्जेने खेळण्यास उत्सुक आहे. कारण मी बर्याच जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांपासून दूर आहे आणि मी चांगल्या स्थितीत आहे." फ्रँचायझीसाठी खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचेही कोहलीने सांगितले. तसेच, मला खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि संघासाठी खेळायचे आहे, असेही तो म्हणाला.
कोहली पुढे म्हणाला, मला काय करायचे आहे यावर माझे आता पूर्णपणे अचूक लक्ष आहे. मला फक्त खूप मजा करायची आहे आणि मैदानावर स्वत:साठी मजा करायची आहे. मी स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसशी ( Captain Faf du Plessis ) त्याचे पहिले काही संवाद कसे होते. यावर बोलताना कोहली म्हणाला, आरसीबीसाठी त्याची निवड होताच मी त्याला मेसेज केला. येणा-या काळाबद्दल मी त्याच्याशी थोडं बोललो. माजी कर्णधार म्हणाला, "साहजिकच ते नंतर अधिकृत होते, परंतु मला माहित होते की फाफला लिलावातून घेणे आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी अगदी स्पष्ट होतो की, आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये एक लीडर हवा होता, जो खूप आदराने ऑर्डर देत असावा.
तो पुढे म्हणाला, फाफ हा कसोटी कर्णधार आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेची खूप प्रशंसा झाली आहे. आम्ही या वर्षी RCB चे नेतृत्व करण्यास पूर्णपणे उत्सुक आहोत. मला खात्री आहे की, तो खूप चांगले काम करेल. संघासह आयपीएल 2022 ची मोहीम सुरू करण्यापूर्वी कोहली पहिले तीन दिवस क्वारंटाईन मधून जाणार आहे.