महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli on Test Captainship : विराटने सोडले मौन; सांगितले कर्णधारपद जाण्याचे कारण ! - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी

बीसीसीआयने कोहली कडील कर्णधारपद काढून रोहित शर्मा याला दिले आहे. यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. यावर आता विराट कोहली याने पत्रकार परिषद ( virat kohli press conference ) घेऊन मोठा खुलासा करत आपली चुप्पी सोडली आहे. कोहलीने आपण रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार ( virat kohli on south africa tour ) असल्याचे सांगितले.

Kohli on South Africa Tour
विराट कोहली

By

Published : Dec 15, 2021, 3:26 PM IST

दिल्ली - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका ( India v South Africa Test match) पार पडणार आहेत. यासाठी भारतीय टीम ही दक्षिण अफ्रिकाच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यापुर्वी भारतीय क्रिकेट टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. बीसीसीआयने कोहली कडील कर्णधारपदकाढून रोहित शर्मा याला दिले आहे. यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. यावर आता विराट कोहली याने पत्रकार परिषद ( virat kohli press conference ) घेऊन मोठा खुलासा करत आपले मौन सोडले आहे. कोहलीने आपण रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार ( virat kohli on south africa tour ) असल्याचे सांगितले.

कर्णधार पद जाण्यामागे नेमके कारण काय ?

आपले कर्णधार पद जाण्यामागे नेमके कारण काय यावर बोलताना विराट कोहलीने सांगितले की, "आईसीसी टुर्नामेंटमध्ये झालेली हार"

'मी वनडेसाठी तयार'

विराट कोहलीने सांगितले की, "मी वनडेसाठी तयार आहे. माझ्याशी असे प्रश्न विचारू नका, हे प्रश्न त्यांना विचारा ज्यांनी माझ्याबद्दल काहीही लिहित आहेत. मी नेहमी उपलब्ध आहे. काही गोष्टी आहेत, ज्या मीडियामध्ये फिरत आहेत. जे काही लोक माझ्याबद्दल अफवा लिहीत आहेत त्या चुकीच्या आहेत. माझ्यात आणि बीबीसीआईमध्ये वनडे सीरीजमध्ये आराम करण्याबाबत कोणतीही बोलणे झालेले नाही.

माध्यमात होती चर्चा -

यापूर्वी माध्यमात अशी चर्चा होती की, रोहित याला वनडेचा कर्णधार केल्यामुळे विराट त्याच्या नेतृत्वात खेळण्यास तयार नाही आहे. आणि तो दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही भाग घेणार नाही.

कर्णधारपद रोहितकडे -

टी-20 विश्वचषक स्पर्धेतून भारत बाहेर पडल्यानंतर कोहलीकडून रोहितकडे जाणार्‍या टीम इंडियाचा लगाम संपूर्ण देशाला दिसत होती, पण प्रतीक्षा होती ती फक्त बीसीसीआयच्या घोषणेची. बुधवारी दक्षिण आफ्रिकेसाठी संघाची घोषणा करण्याबरोबरच, बीसीसीआयने विराट कोहलीकडून भारताच्या मर्यादित फॉरमॅटचे कर्णधारपदही काढून घेतले आणि रोहित शर्माला यापुढे संघाचा नायक म्हणून "पुढे" जाण्याची जबाबदारी सोपवली होती. या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या येत आहेत त्यानुसार बीसीसीआयने ४८ तासांपासून कोहलीला वनडे कर्णधारपदावरून नाव माघारी घ्यावे यासाठी प्रतीक्षा केली होती. त्याला T20 च्या कर्णधारपदाप्रमाणे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून स्वेच्छेने पायउतार होण्यास सांगण्यात आले परंतु त्याने तसे केले नाही. अखेर 49व्या तासाला बीसीसीआयने रोहित शर्माला मर्यादित षटकांचे कर्णधारपद बहाल केले.

पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी -

टीम इंडिया सध्या प्रोटोकॉलनुसार मुंबई विमानतळाजवळ तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईनमध्ये आहे आणि भारतीय संघ 16 डिसेंबर रोजी चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला जाईल. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर खेळाडूंना स्थानिक नियमांनुसार प्रोटोकॉल अंतर्गत क्वारंटाईन करावे लागेल. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत दौऱ्याचे वेळापत्रक

पहिली कसोटी - 26 ते 30 डिसेंबर , दुपारी 1.30 वाजल्यापासून, सेंच्युरियन.

दुसरी कसोटी - 3 ते 7 जानेवारी 2022, दुपारी 1.30 वाजल्यापासून, जोहान्सबर्ग

तिसरी कसोटी - 11 ते 15 जानेवारी 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, केप टाऊन

हेही वाचा -कोहलीची उचलबांगडी आणि रोहित कर्णधार होण्यामागची रंजक कहाणी

ABOUT THE AUTHOR

...view details