कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) संघात 16 फेब्रुवारीपासून टी- 20 सामन्यांची मालिका खेळली जाणार (T20 series starts February 16 ) आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कोलकाता येथे दाखल झाले आहेत. या मालिकेत तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. मागील काही काळापासून विराट कोहली मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्या अगोदर सोमवारी नेटमध्ये ( Virat Kohli practice in the net ) कसून सराव केला आहे.
या सराव सत्रात सर्वात अगोदर विराट कोहली आला होता. त्याने भारताच्या सपोर्ट स्टाफसोबत थ्रो-डाउनचा सराव ( Virat Kohli throw-down practice ) केला. त्यानंतर त्याने 45 मिनिटे नेटमध्ये जास्त वेळ फलंदाजी केली.