महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट कोहलीचा नवा लूक व्हायरल; काही म्हणाले कबीर सिंग तर काही म्हणतात बॉबी देओल - virat kohali new look

विराट कोहलीचे एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत विराटचा नवा लूक दिसत आहे. याा विराटचे लांब केस आणि रुंद दाढी दिसत आहे.

virat kohli
विराट कोहली

By

Published : May 26, 2021, 11:06 AM IST

चंडीगढ़/मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील कोट्यावधी लोकांचा स्टाईल आयकॉन आहे. त्यांच्या प्रत्येक लूकवर चाहते घायाळ होतात. सध्या भले तो मैदानापासून लांब आहे. तरीही तो एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विराटचा नवा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

कबीर सिंग आणि बॉबी देओलसोबत तुलना

या फोटोत कोहली पिवळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. यात त्याचे केस बरेच लांब झाले आहेत आणि दाढीही वाढली आहे. हा फोटो व्हायरल होताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या लूकवरून विराटची तुलना कबीर सिंग तर काहींनी अभिनेता बॉबी देओलसोबत केली आहे. विराट कोहलीच्या या लूकवर अनेक चर्चा होत आहे. मात्र, हा फोटो कधी काढला गेला आहे याबाबत कोणालाच माहिती नाही.

भारताचा इंग्लंड दौरा

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय संघ सज्ज असून त्यापूर्वी भारतीय संघाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. २ जूनला भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप आणि इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details