दुबई: विराट कोहली ( Virat Kohli ) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवेल, असे भाकीत फार कमी लोकांनी केले असेल. पण गुरुवारी दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध 1020 दिवसांची प्रतीक्षा 2022 आशिया चषकात संपुष्टात आली, जेव्हा त्याने केवळ 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. कोहलीने आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी ( Virat Kohli tied Ricky Ponting ) केली.
तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा विराट चौथा भारतीय (Virat kohli fourth indian batsman ) -
यासोबतच विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहलीचे ( Virat Kohli century record ) नावही जोडले गेले आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला ( Kohli scored centuries in all three formats ) आहे. कोहलीच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी हा पराक्रम केला आहे.