केपटाऊन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसऱ्या कसोटीतील ( India v South Africa 3rd Test ) आज चौथा दिवस आहे. दक्षिण आफ्रिका संघाला आज विजयासाठी 111 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला विजयासाठी 8 विकेट्स घेण्याची गरज आहे. परंतु काल तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय कर्णधार आणि विराट कोहली आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना राग अनावर करताना दिसून आले.
दक्षिण आफ्रिका संघाला भारताने 212 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरऱ्या डावाल सुरुवात झाली होती. या डावाच्या 21व्या षटकात, रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर कर्णधार डीन एल्गर ( Captain Dean Elgar ) पायचित झाला. त्यावर भारतीय खेळाडूंनी आणि आश्विनने जोरदार अपील केली. त्यानंचर मैदानी पंचांनी सुद्धा एल्गर पायचित केले. त्यामुळे भारतीय गोलंदाज आनंद व्यक्त करत होते. त्यावेळी एल्गरने डीआरएस घेतला ( Elgar took the DRS ). त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांंकडे गेला. तिसऱ्या पंचांनी आपल्या रिप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या वरुन जातोय असे दाखवले. त्याचबरोबर एल्गरला नाबाद घोषित केले. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयाने विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू संतापले. त्यामुळे त्यांनी शाब्दिक पद्दतीने राग व्यक्त करत निराश झाले. भारतीय खेळाडूंना माहित होते की, त्यांचे प्रत्येक संभाषण स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड केले जात आहे. अशा परिस्थितीत ही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर केला.