नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) तिसऱ्या सामन्यात आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना होता. विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात कोहलीने मोठी कामगिरी केली.
T20 World Cup : कोहलीचा आणखी एक विश्वविक्रम, वर्ल्डकपमध्ये पुर्ण केल्या 1000 धावा - Kohli created history
विराट कोहलीने (virat kohli) रविवारी T20 विश्वचषकात (T20 World Cup ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावांच्या छोट्या खेळीत टी-20 विश्वचषकात मोठा विक्रम केला.
कोहलीचा आणखी एक विश्वविक्रम: या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या (virat kohli) नावावर टी-20 विश्वचषकात 989 धावा होत्या. 1000 धावा करण्यासाठी 11 धावांची गरज होती. आज 12 धावा केल्यानंतर तो T20 विश्वचषकातील दुसरा पहिला 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. T20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
T20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या: विराट कोहलीने आता T20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 21 डावात 1 हजार धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 91 आहे. विराट कोहलीपूर्वी श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने हे स्थान गाठले आहे. त्याने 31 सामन्यांत 39.07 च्या सरासरीने 1016 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत.