महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष पूर्ण - सनथ जयसूर्या

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आहेत.

virat-kohli-completed-his-13-years-in-international-cricket
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे 13 वर्ष पूर्ण

By

Published : Aug 19, 2021, 3:06 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता त्याने 14 व्या वर्षात प्रवेश केला आहे. मागील तेरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून नाव कमवलं आहे.

मागील आठवड्यात इंग्लंडविरुद्ध लॉर्डस् येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पण विराटच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.

विराट कोहली मागील काही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने 2019 नंतर अद्याप एकही शतक झळकावलेले नाही. सचिन तेंडुलकरच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके आहेत. तर विराटच्या नावे 43 शतक आहेत.

विराट कोहलीने अखेरचे शतक 2019 मध्ये झळकावले होते. यामुळे तो 2020 मध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल असा कयास होता. विशेष म्हणजे विराटने वर्षाच्या सुरूवातीला दोन अर्धशतक झळकावत तसे संकेत दिले होते. पण पुढील दीड वर्षात त्याने 5 अर्धशतक झळकावली. परंतु त्याला शतक झळकावता आलं नाही.

जानेवारी 2020 नंतर विराट कोहलीने 12 एकदिवसीय, 15 टी-20 आणि 10 कसोटी सामने खेळली आहेत. पण यात त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने अखेरचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकाता येथे बांगलादेश विरूद्ध झळकावले होते.

विराट कोहलीने 254 एकदिवसीय सामन्यात 12 हजार 169 धावा केल्या आहेत. तर सचिनच्या नावे 18 हजार 246 धावा आहेत. या यादीत विराट कोहलीचा सचिन, कुमार संघकारा, रिकी पाँटिग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने यांच्यानंतर सहावा क्रमांक लागतो.

विराट कोहलीने 2008 मध्ये बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता पर्यंत त्याने 94 कसोटी सामने खेळली आहेत. यात 27 शतकासह त्याने 7 हजार 609 धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत 36 व्या स्थानावर आहे.

हेही वाचा -राशिद खान आणि मोहम्मद नबी IPL 2021 खेळणार का? SRH ने दिलं उत्तर

हेही वाचा -T-20 वर्ल्ड कप : 'या' दिवशी रंगणार भारत-पाक संघाचा पहिला सामना; वेळापत्रक जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details