महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Record : कोहलीची विश्वचषकात आणखी एक 'विराट' कामगिरी; रचला नवा इतिहास

Virat Kohli Record : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं विश्वचषकात 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. याआधी वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरनं 2 हजार 278 धावा केल्या होत्या.

Virat Kohli
Virat Kohli

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 8:10 PM IST

हैदराबाद Virat Kohli Record : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. कोहलीनं विश्वचषकात 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरलाय. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरनं ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोहलीनं हा इतिहास रचलाय.

विश्वचषकात 1500 हून अधिक धावा : सचिन तेंडुलकरनं विश्वचषकात 2278 धावा केल्या असून, तो या यादीत अव्वल स्थानावर आहे. या यादीत विराट कोहलीनं दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यानं 1500 हून अधिक धावा करत इतिहासात आपलं नाव कोरलंय. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 1420 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

8 सामन्यात 500 हून अधिक धावा : विराट कोहलीनं 2011 मध्ये विश्वचषकात पदार्पण केलं होतं. त्यानं बांगलादेशविरुद्ध विश्वचषक पदार्पणात शतक झळकावलं होतं. त्यानं नऊ सामन्यांमध्ये 282 धावा केल्या होत्या. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यानं 8 सामन्यात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 500 हून अधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी क्विंटन डी कॉक, रचिन रवींद्र यांनी ही कामगिरी केली होती. विराट कोहलीनं या स्पर्धेत एक शतक, 5 अर्धशतकं झळकावली आहेत.

कोहली दुसऱ्या क्रमांकावर : महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून कोहलीचं नाव क्रिकेट विश्वचषकात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी विराट कोहली त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनच्या नावावर 49 वनडे शतकं आहेत, तसंच कोहलीच्या नावावर देखील 49 शतकं नोंदवण्यात आली आहेत.

हेही वाचा -

  1. Virat Kohli Birthday : विराटची क्रिकेटच्या देवाशी बरोबरी; सँड आर्टिस्टकडून कोहलीला खास शुभेच्छा
  2. Virat Kohli : कोहलीचा 'विराट' पराक्रम, सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी
  3. Shreyas Iyer Father Interview : श्रेयस अय्यरच्या वडिलांसोबत 'ईटीव्ही भारत'चा 'वन टू वन'; सांगितली अनेक गुपितं

ABOUT THE AUTHOR

...view details