नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात ( Virat Kohli Australia Room Video Leaked )आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ ( Virat Room Video Leaked ) लीक झाला आहे. हा व्हिडीओ एका चाहत्याचा ( Video is of a Fan Who Made a Vlog in Kohli Absence ) आहे, ज्याने कोहलीच्या गैरहजेरीत त्याच्या खोलीत जाऊन व्लॉग केला होता. यामुळे संतापलेल्या कोहलीने गोपनीयतेचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. आता या प्रकरणावरून चांगलाच ( Kohli has Taken Issue of Privacy Seriously ) गदारोळ झाला आहे.
स्वतः विराट कोहलीने हा मुद्दा गांभीर्याने केला उपस्थित :स्वतः कोहलीने त्याचा व्हिडीओ शेअर करून गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कोहलीने लिहिले की, मला समजते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहून खूप आनंदित झाले आहेत, त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. मी नेहमीच त्याची प्रशंसा करतो. परंतु, येथे हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या गोपनीयतेबद्दल खूप चिंतित आहे.