मोहाली : भारत आणि श्रीलंका ( India and Sri Lanka ) संघात शुक्रवार (4 मार्च) पासून दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. तसेच हा सामना विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना आहे. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या ( Virat Kohli 100th Test match ) तयारीसाठी येथील पीसीए स्टेडियमवर नेटमध्ये जोरदार सराव केला. या सराव सत्रात त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही फलंदाजीचा भरपूर सराव केला.
दोन्ही स्टार खेळाडूंनी वेगवेगळ्या नेटवर अनेक वेळा फलंदाजीचा सराव केला. ज्यामध्ये थ्रोडाउन, फिरकीपटू, वेगवान गोलंदाज आणि नेट गोलंदाजांविरुद्धच्या सरावात समावेश होता. रोहितने मोहम्मद शमीच्या चेंडूंवर काही शॉट्स खेळले. तसेच कोहलीने मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीचा सामना ( Kohli faced bowling of Mohammad Siraj ) करताना काही कव्हर ड्राईव्ह सुद्धा मारले.
रोहित आणि विराटनो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नेटवर कसून फलंदाजी केली. एकेकाळी उपकर्णधार असलेल्या रोहितने 30 यार्डांच्या अंतरावरून माजी कर्णधार कोहलीच्या सरावावरही लक्ष ठेवून होता. रोहितने सुमारे 45 मिनिटे फलंदाजी ( Rohit batted for 45 minutes ) केल्यानंतर संघाच्या सरावाची पाहणी केली.