अहमदाबाद :आयपीएल 2022 या स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व दहा संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत हार्दिक पांड्या ( All-rounder Hardik Pandya ) गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत गुजरात टायटन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोच विक्रम सोलंकी ( Coach Vikram Solanki ) यांनी हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर समाधान व्यक्त केले आहे. सोलंकी यांच्या मते, आपण हार्दिक पांड्याकडून कमी मागणी केली पाहिजे. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा काही महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर गुजरात टायटन्स संघाच्या नेतृत्वासाठी धुरा देखील त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याने लवकर तंदुरुस्त होणे संघासाठी आणि त्याच्यासाठी महत्वाचे आहे.
हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत विक्रम सोलंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम सोलंकी यांनी द टेलिग्राफला मुलाखत ( Interview with The Telegraph ) दिली आहे. या द टेलिग्राफच्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, ''हार्दिक पांड्या त्याच्या खेळाच्या प्रत्येक पैलूवर मेहनत घेत आहे. रिहॅबिलिटेशन आणि रिकवरीला घेऊन तो सात्तत्याने काम करत आहे. त्याला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वेग आणायचा आहे. या गोष्टीबद्दल तो खुपच दक्ष आहे.