दुबईदाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने Vijay devarakonda लायगरमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. साऊथ इंडियामध्ये खूप प्रसिद्ध असलेल्या विजयचा खूप मोठा फॅन वर्ग आहे. तसेच लायगर प्रमोट करताना त्याच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसली. त्याला हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे तो हरखून गेला होता. परंतु लायगर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत liger promotion box office collection नाहीये.
बऱ्याचदा असे होते की, सुरुवातीला चित्रपट आपटतो. परंतु काही दिवसानंतर तो मोठ्या प्रमाणात गर्दी खेचू लागतो. लायगरच्या निर्मात्यांना आणि खासकरून विजय देवरकोंडाला याची नक्कीच जाणीव असावी. तसेच जरी देशात चित्रपटाला प्रतिसाद मिळत नसला तरी परदेशात या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय हे चित्रपटाच्या वर्ल्डवाईड कलेक्शन वरून कळते. त्यामुळेच विजय त्याचा लायगर दुबई मध्ये प्रमोट करताना दिसतोय.