नवी दिल्ली :भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळुरूला पोहोचला आहे. नागपूर कसोटीपूर्वी संघ तेथे चार दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेणार आहे. सराव शिबिरानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ९ फेब्रुवारीला भारताशी भिडणार आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उस्मान ख्वाजा याला भारता येण्यासाठी व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे तो भारतात येऊ शकला नाही. मात्र रात्री उशिरा भारत सरकारने उस्मान ख्वाजा याला व्हिसा दिला. तो आज ऑस्ट्रेलियाहून बेंगळुरूला जाणार आहे.
उस्मान ख्वाजाची कारकीर्द : उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे झाला. त्याच्या जन्मानंतर, कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. संघात सामील होण्याआधी उस्मान ख्वाजाहा न्यू साउथ वेल्सकडून क्रिकेट खेळला आहे. उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 56 कसोटी सामन्यांमध्ये 13 शतकांसह 4162 धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1554 धावा केल्या आहेत आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये 241 धावा केल्या आहेत. कर्णधार पॅट कमिन्स याला त्याच्याकडून खूप आशा आहेत. उस्मान ख्वाजा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चमकदार कामगिरी करू शकतो.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामने : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 9 तारखेला सुरू होत आहे. पहिली कसोटी ही 9 ते 13 फेब्रुवारीला नागपूर येथे होत आहे. दुसरी कसोटी ही 17 ते 21 फेब्रुवारीला दिल्लीत होत आहे. तिसरी कसोटी ही धरमशाला येथे 1 ते 5 मार्चला होणार आहे. चौथी कसोटी अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चला होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव. ऑस्ट्रेलिया संघ:पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.
हेही वाचा :Suryakumar Yadav Catch Video : सूर्यकुमार यादवला फिन ऍलनचा झेल टिपताना पाहून सगळेच आवाक, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव