महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तान सुपर लीगच्या फाइनलआधी अचानक २ खेळाडूंचे निलंबन

पेशावर झाल्मीचा फलंदाज हैदर अली आणि वेगवान गोलंदाज उमेद आसिफ हे दोघे पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात खेळ शकणार नाहीत. त्यांनी बायो बबलच्या नियमांचा भंग केला असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

umaid-asif-and-haider-ali-suspended-ahead-of-multan-sultans-vs-peshawar-zalmi-psl-final
पाकिस्तान सुपर लीगच्या फाइनलआधी अचानक २ खेळाडूंचे निलंबन

By

Published : Jun 24, 2021, 8:01 PM IST

आबुधाबी -पेशावर झाल्मीचा फलंदाज हैदर अली आणि वेगवान गोलंदाज उमेद आसिफ हे दोघे पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात खेळ शकणार नाहीत. त्यांनी बायो बबलच्या नियमांचा भंग केला असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आज पेशावर झाल्मी आणि मुल्तान सुल्तान यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी सांगितलं की, बुधवारी अली आणि आसिफ या दोघांनी बायो बबलच्या नियमांचा भंग केला. त्यामुळे स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या समितीने दोन्ही खेळाडूंचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईमुळे हैदर अली इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकला आहे.

पीसीबीने म्हटलं की, हैदर अलीने बायो बबल मधून बाहेर येत लोकांशी संपर्क ठेवला. हा बायो बबलच्या नियमांचा भंग आहे. अलीने आरोपाचा स्वीकार केला असून त्याने आपण सोशल डिस्टन्सिंग राखण्यात अपयशी ठरल्याचे म्हटलं आहे.

हैदर अलीच्या जागेवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुल्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज शोएब मकसूदला पाकिस्तान संघात संधी मिळाली आहे. पीसीबीचे निवडकर्ते मोहम्मद वसीम, मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि कर्णधार बाबर आझम यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा -'WTC च्या विजयाने २०१९ विश्वकरंडक फायनलमधील पराभवाचं नुकसान भरून निघालं'

हेही वाचा -WTC स्पर्धेत कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा

ABOUT THE AUTHOR

...view details