नवी दिल्ली: वेस्ट इंडिज येथे आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारताच्या 19 वर्षाखालील संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आता अंतिम सामन्यात पोहचला आहे. या प्रसंगी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा (Under-19 World Cup Tournament) अंतिम सामना खेळणाऱ्या भारतीय संघासोबत संवाद साधला आहे.
विराट कोहलीने अँटिग्वा येथील हॉटेलमध्ये असलेल्या भारतीय संघासोबत 'झूम' कॉलवरून संवाद अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार यश धुल (Under-19 Indian captain Yash Dhul), राजवर्धन हंगरगेकर आणि कौशल तांबे यांच्याशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्याचवेळी, त्याने भारतीय ज्युनियर खेळाडूंना सांगितले की 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अर्थ काय आहे,जो इंग्लंडचा सामना करेल. 2016 पासून या स्तरावर भारताची ही सलग चौथी अंतिम फेरी आहे.