शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज 44वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. उभय संघातील हा सामना शारजाहच्या मैदानात खेळला जाईल. चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल तर हैदराबाद तळाशी आहे. दरम्यान, हैदराबादचे या स्पर्धेतील जवळपास आव्हान संपुष्टात आलेले आहे.
सनरायझर्स हैदराबादने 10 पैकी 8 सामने गमावले आहेत. पण त्यांनी मागील सामन्यात राजस्थानवर विजय मिळवला आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नरला वगळण्याचा निर्णय व्यवस्थानाने घेतला आणि त्याच्या जागेवर जेसन रॉयला अंतिम संघात स्थान मिळाले. तेव्हा जेसन रॉयने या संधीचा फायदा घेत राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 60 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर यांनी देखील चांगला मारा केला. अशीच कामगिरीची आशा त्या सर्वांकडून हैदराबादच्या संघाची आहे.
दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने सलग तीन विजय मिळवले आहेत. त्यांची प्ले ऑफ फेरीतील जागा जवळपास निश्चित आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने 2 गडी राखून विजय मिळवला होता. यात रविंद्र जडेजाने 8 चेंडूत 22 धावांची वादळी खेळी केली होती. फाफ डू प्लेसिस आणि ऋुतुराज गायकवाड यांनी चांगली सुरूवात दिली होती. पण मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाटी रायुडू, धोनी यांनी नांगी टाकली. यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत आला होता. तेव्हा जडेजाने स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. आजच्या सामन्याच्या माध्यमातून मोईन अली, सुरेश रैनासह अंबाटी रायुडूला लय मिळवण्याची संधी आहे.
- चेन्नई सुपर किंग्सचा संघ -
- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋुतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, लुंगी नगिदी, दीपक चाहर, इमरान ताहिर, फाफ डु प्लेसिस, राबिन उथप्पा, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड, जेसन बेहरेनडोर्फ, कृष्णप्पा गौतम, मिशेल सँटनर, आर साई किशोर, हरि निशांत, एन जगदीसन, चेतेश्वर पुजारा, केएम आसिफ, हरिशंकर रेड्डी आणि भगत वर्मा.
- सनरायझर्स हैदराबादचा संघ -
- केन विल्यमसन (कर्णधार), डेविड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रदरफोर्ड, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, राशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, बासिल थंपी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे सुचित, जेसन होल्डर, विराट सिंह, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान आणि जेसन रॉय.
हेही वाचा -लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर
हेही वाचा -IND W vs AUS W: भारताच्या लंचपर्यंत 1 बाद 101 धावा; स्मृतीचे नाबाद अर्धशतक