महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

GT Director Vikram Solanki : हार्दिक पांड्याकडे जिंकण्याची क्षमता - जीटी संचालक सोलंकी - cricket news

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा अंतिम सामना रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाच्या संचालकाने ( Titans team director ) हार्दिक पांड्याबाबत वक्तव्य केले आहे. तो म्हणतो की, पांड्यामध्ये अंतिम सामना जिंकण्याची क्षमता आहे.

Hardik Pandya
Hardik Pandya

By

Published : May 29, 2022, 4:58 PM IST

अहमदाबाद:आयपीएल 2022 चा अंतिम सामना रविवारी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचे संचालक विक्रम सोलंकी यांनी प्रतिक्रिया ( GT Team Director Vikram Solanki ) दिली आहे. त्यांच्या मते गुजरात टायटन्सचा संघ तीन स्तंभावर उभा आहे.

विक्रम सोलंकी यांनी म्हटले आहे की, त्यांचा संघ तीन खांबांवर उभा ( Gujarat team stands on three pillars ) आहे. जसे कठोर परिश्रम करणे, स्मार्ट क्रिकेट खेळणे आणि चुका न करणे. यामुळेच कर्णधार हार्दिक पांड्याचा संघ आयपीएल 2022च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. ते असेही म्हणाले की पांड्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे, ज्यामुळे तो गुजरात टायटन्सच्या नेतृत्वात आघाडीवर आहे.

ते पुढे म्हणालो, “माझ्यासाठी हे अगदी स्पष्ट होते की जेव्हा आम्ही हार्दिकशी कर्णधारपदाबद्दल बोललो तेव्हा तो (हार्दिक पांड्या) याबद्दल उत्साहित होता. तो मजेशीर पद्धतीने आणि स्वतःच्या स्टाइलने क्रिकेट खेळतो. सोलंकी म्हणाले की, खेळाडूंना चुका टाळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आणि त्यांचे अनुभव शेअर करण्याची पंड्याची शैली ही संघाच्या वाढीस मदत झाली आहे. सोलंकी म्हणाले की, तो त्याच्या सर्व अनुभवांचा वापर करून आपल्याला पाहिजे त्या मार्गाने नेतृत्व ( Hardik Pandya Ability to win ) करतो. तो खरोखर चांगले काम करत आहे.

संघातील संस्कृतीचे सांगताना सोलंकी ( Vikram Solanki Told About Team ) म्हणाले की, ते तीन खांबांवर आधारित आहे. ते म्हणाले, आमचा संघ तीन खांबांवर उभा आहे. कठोर परिश्रम करा, स्मार्ट क्रिकेट खेळा आणि आम्ही स्वीकारतो की आम्ही चुका करणार नाही. अहमदाबादमध्ये एक लाख प्रेक्षकांसमोर राजस्थान रॉयल्सविरुद्ध अंतिम सामना खेळण्याच्या मोठ्या संधीसाठी संघ तयार आहे का, असे विचारले असता सोलंकी म्हणाले, “मला वाटते की आम्ही आमचे क्रिकेट ज्या पद्धतीने खेळतो त्यावर आमचा विश्वास आहे.” आणि आम्ही कोणत्याही दबावात पुढे जाऊ. कारण अशा परिस्थितीतून आमच्या खेळाडूंना ते कसे हाताळायचे हे माहित आहे. ही आमची पहिली फायनल आहे आणि आम्हाला काहीतरी खास करण्याची संधी आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Final Rr Vs Gt : संजूसेना विरुद्ध हार्दिकसेना आज फायनलसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?

ABOUT THE AUTHOR

...view details