मुंबई: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Rajasthan Royals vs Mumbai Indians ) यांच्यात शनिवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मुंबईला 23 धावांनी दारुन पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) संघाला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हा सामना संपल्यानंतर मुंबईचा युवा खेळाडू तिलक वर्माने ( Young player Tilak Verma ) प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी तो शेवटपर्यंत थांबला असता तर बरे झाले असते.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात तरुण प्रतिभांना त्यांचे कौशल्य मोठ्या स्तरावर दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळते आणि यावेळी तिलक वर्माला ही संधी मिळाली आहे, जो आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. तिलकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलमधील पहिले अर्धशतक ( Tilak Verma's first half century ) झळकावले. परंतु त्याची अर्धशतक खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, तिलक वर्मा मुंबईची धावसंख्या 40/2 असताना क्रीजवर आला होता.त्यानंतर त्याने काही उत्कृष्ट शॉट्स लगावत तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तिलकने 33 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. मात्र, त्याच्या उत्कृष्ट खेळीनंतरही मुंबईला 23 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या ( Video shared by Mumbai Indians ) एका व्हिडिओमध्ये आपल्या खेळीबद्दल बोलताना तिलक वर्मा म्हणाला, मी सामना संपवायला थांबलो असतो तर बरे झाले असते. आगामी सामन्यांमध्ये मी तसा प्रयत्न करेन. मी सचिन (तेंडुलकर) सर, महेला (जयवर्धने) सर आणि रोहित (शर्मा) भाई यांच्याशी बोलेन आणि त्यांना विचारेन की मी कशी सुधारणा करू शकतो. तसेच तो पुढे बोलताना म्हणाला, प्रत्येक खेळ हा नवीन खेळ असतो. 61 धावांची ही खेळी आता जुनी झाली आहे. संघाला विजय मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक खेळाची सुरुवात शून्यापासून होते. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. पुढच्या सामन्यात आम्ही जोरदार पुनरागमन करू आणि आम्हाला चांगला खेळ करायला आवडेल.
मुंबई इंडियन्ससाठी अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज -त्याच्या जबरदस्त खेळीदरम्यान, तिलक वर्मा 19 वर्षे आणि 145 दिवसांच्या वयात मुंबई इंडियन्ससाठी अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. या कामगिरीबद्दल तिलक म्हणाला, मी मुंबई इंडियन्सचा सर्वात तरुण अर्धशतक करणारा खेळाडू बनलो आहे. हे जाणून मला खूप आनंद झाला. सर्वप्रथम मी माझ्या आवडत्या फ्रेंचायझीसाठी खेळत आहे. आणि मग, त्याच्यासाठी अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू असल्याने मला खूप आनंद होतो. तिलक वर्माच्या अगोदर ही कामगिरी इशान किशनच्या ( Ishan Kishan ) नावावर होती, ज्याने 2018 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 19 वर्षे, 278 दिवस वयात अर्धशतक झळकावले होते.
हेही वाचा -Women Cricket World Cup 2022: इंग्लंडला 71 धावांनी हरवून ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा पटकावले विजेतेपद