मुंबई: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) 26 मार्चला म्हणजे फक्त तीन दिवसात सुरुवात होणार आहे. या हंगामाच्या ट्रॉफीवर दावेदारी सिद्ध करण्यासाठी दहा संघ सज्ज झाले आहे. त्याचबरोबर आयोजकांनी आयपीएलच्या सामन्यासाठी एकूण आसन क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएल सामन्याच्या तिकीट विक्रीबद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यानुसार 23 मार्चला तिकिटांची विक्री सुरु होणार आहे.
आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाचे 70 सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरातील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) सामन्यांसाठी जी तिकीट विक्री ( IPL Ticket Sale ) होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील सामन्यांसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरू होईल.