लंडन: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण ( NZ 3 Players Corona Positive ) झाल्याचे समोर आले आहे. पहिली कसोटी 2 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. ज्या खेळाडूंना संसर्ग झाला आहे त्यामध्ये अव्वल फळीतील फलंदाज हेन्री निकोल्स, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेसन ( Bowling coach Shane Jurgeson ) यांचा समावेश आहे. आता त्यांना हॉटेलमध्येच पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट ( New Zealand Cricket ) ने शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ब्राइटनमध्ये ससेक्सविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या सकाळी, संघाचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, ज्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. ससेक्सविरुद्धचा चार दिवसांचा सराव सामना नियोजित वेळेनुसार होईल, असेही त्यात म्हटले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघातील उर्वरित सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.