ब्रिजटाउन (बारबाडोस):वेस्टइंडीज आणि इंग्लंड संघाच पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज ब्रिजटाउन येथे पार पडला. या सामन्यात वेस्टइंडीज संघाने रोवमॅन पॉवेलच्या शतकाच्या (Rovman Powell's century) जोरावर इंग्लंडला 20 धावांनी धूळ चारली. त्याचबरोबर या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी मिलवली आहे.
या सामन्यात रोवमॅन पॉवेलने 53 चेंडूत 107 धावांची खेळी साकारली. तसेच वरिष्ठ खेळाडू बल्लेबाज निकोलस पूरनने 43 चेंडूत 70 धावा केल्या होत्या. या दोघांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्टइंडीजने निर्धारित 20 षटकात पाच विकेट गमावून 224 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. त्यामुळे इंग्लंड संघाला 225 धावांचे लक्ष्य (Challenge to England by 225 runs) मिळाले होते. या आव्हानांचा पाठलाग करायला उतरलेल्या संघाकडून टॉम बॅंटन (73) आणि फिल साल्ट (57) यांनी आपली अर्धशतकं झळकावली. परंतु इंग्लंडचा संघ 20 षटकात नऊ विकेट गमावून 204 धावांपर्यंत मजल मारु शकला. त्यामुळे 20 धावांनी पराभव पत्करावा लागला. रोमारियो शेफर्ड वेस्टइंडीजसाठी सर्वश्रेष्ठ गोलंदाज ठरला. कारण त्याने आपल्या चार षटकात 59 धावा देत तीन विकेट मिळवल्या. कप्तान कीरोन पोलार्डने 31 धावा देत दोन विकेट घेतल्या.
तत्पुर्वी इंग्लंड संघाने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी (England won the toss elected bowl first) करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर ब्रँडन किंग (10) धावा करुन वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टेनच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच षटकात 11 धावांवर बाद झाला. तसेच शाई होप ही लवकर बाद झाला. बँटनने लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर चार धावा केल्या. पण निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी वेस्ट इंडिजचा डाव पुढे नेला आणि तिसर्या विकेटसाठी 122 धावांची अभेद्य भागीदारी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.