हैदराबाद: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलचा पंधरावा हंगाम खेळला जात आहे. आयपीएल 2022 चा हंगाम अतिशय शानदार पद्धतीने पार पडत आहे. आयपीएलमधील रोमांचक सामने क्रिकेट प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2022 चा अर्धा हंगाम पूर्ण झाला आहे. आयपीएलमध्ये तीन संघ चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत त्यांचे प्लेऑफमध्ये जाणे जवळपास निश्चित दिसत आहे.
गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) संघ - आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल 2022 मध्ये संघाने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. या संघाचे नेतृत्व स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या करत आहे. तो गोलंदाजीत खूप चांगले बदल करतो. हार्दिकने बॅटनेही कमाल दाखवली आहे. त्याने सात सामन्यांत 295 धावा केल्या आहेत. संघाकडे शुभमन गिलसारखा सलामीवीर आहे, ज्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. मधल्या फळीत त्याच्याकडे डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहरसारखे फलंदाज आहेत. अशा स्थितीत हा संघ प्लेऑफमध्ये पहिले स्थान मिळवू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघ -आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली होती. या संघाला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने दणदणीत पुनरागमन करत पुढील पाच सामने जिंकले. हैदराबादची गोलंदाजी खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे उमरान मलिक, अब्दुल समद आणि टी नटराजनसारखे गोलंदाज आहेत. त्याच्याकडे डेथ ओव्हर्ससाठी भुवनेश्वर कुमार आणि रोमॅरियो शेफर्ड आहेत. हैदराबादही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.