महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction : यंदा लिलावात 'अशा' सात घटना घडल्या, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल

आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा लिलाव रविवारी संपला. बंगळुरूमध्ये दोन दिवस चाललेल्या या लिलावात 204 खेळाडू विकले गेले. त्याच वेळी लिलावात अशा सात घटना घटना घडल्या, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

IPL 2022 Mega Auction
IPL 2022 Mega Auction

By

Published : Feb 14, 2022, 5:20 PM IST

बंगळुरु -आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात 204 खेळाडूंवर 551.7 कोटीची बरसात करण्यात आली. यामध्ये 137 भारतीय आणि 67 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हा लिलावाचा कार्यक्रम बंगळुरु येथे पार पडला. परंतु यंदाच्या आयपीएल लिलावात काही अनपेक्षित घटना घडल्या. ज्याचा आपण आढावा घेणार आहोत.

मिस्टर आयपीएल राहिला अनसोल्ड -

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Former Indian cricketer Suresh Raina) यावेळी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. चेन्नई सुपर किंग्सचा चिन्ना थाला आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. पहिल्यादा अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंच्या नावावर पुन्हा एकदा बोली लावण्यात आली. मात्र त्यात रैनाचे नाव नव्हते. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हटले जाते (Suresh Raina is called Mr. IPL), त्याच्या नावावर ५ हजार ५०० हून अधिक धावा आहेत. मात्र आता रैना आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

जखमी आर्चरवर पैशांचा पाऊस -

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चक हा सध्याच्या घडीचा सर्वात बेस्ट गोलंदाज मानला जातो. क्रिकेटचे स्वरूप कोणतेही असो, आर्चर हिट ठरला आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून तो दुखापतीशी झुंज देत आहे. या कारणामुळे तो अॅशेस आणि आयपीएल 2021 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. पण असे असतानाही जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने आठ कोटी रुपयांना खरेदी केले, तेही या हंगामात खेळू शकणार नसताना. म्हणजेच जोफ्रा आर्चर थेट आयपीएल 2023 मध्ये दिसणार आहे.

दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड -

यंदाच्या लिलावात फ्रेंचायझीच्या रणनितीचा अंदाज घेता आला नाही. कारण टी-20 स्पेशालिस्ट इंग्लिश फलंदाज डेव्हिड मलान (English batsman David Malan), ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आरोन फिंच, इंग्लंडच्या टी-20 संघात क्रांती घडवणारा कर्णधार इऑन मॉर्गन यांना यावेळी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे अमित मिश्रा आणि पियुष चावला यांना देखील कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

परदेशी फिरकीपटूंना मिळाला नाही भाव -

यावेळी आयपीएल स्पर्धा भारतात होणार असल्याने फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो. मात्र यावेळी संघांनी विदेशी फिरकीपटूंना भाव न देता देशी फिरकीपटूंवर विश्वास व्यक्त केला आहे. इंग्लंडचा आदिल रशीद, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान, दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी यांना कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तेही जेव्हा त्याची गणना सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये होत असताना. मुजीब उर रहमानला रशीदनंतर सर्वोत्तम मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखले जाते. यावेळी फ्रेंचायझींनी नावावर नाही, तर खेळाडूंचे काम आणि त्याची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आहे.

शत्रू झाले मित्र -

आयपीएलमुळे विविध देशांच्या खेळाडूंमधील बॉन्डिंग वाढले आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. पण यावेळी आयपीएलमध्ये कधीकाळी शत्रू असलेले आता मित्र झाले आहेत. म्हणजेच जे भूतकाळात कधी ना कधी समोरासमोर आले आहेत, ते आता एकाच संघात आहेत. बडोदा संघात युद्ध लढणारे कृणाल पांड्या आणि दीपक हुडा आता लखनऊ सुपर जायंट्सकडून एकत्र खेळणार आहेत. तर मंकड प्रकरणामुळे टक्कर झालेले रविचंद्रन अश्विन-जोस बटलर आता राजस्थान संघाचा भाग बनले आहेत.

मेगा लिलावात ह्यू अॅडम्स स्टेजवरून खाली कोसळले (Hugh Adams collapsed down the stage) -

यावेळी मेगा लिलाव करण्याची जबाबदारी इंग्लंडच्या ह्यू अॅडम्स (Hugh Adams of England) यांची होती, मात्र पहिल्याच दिवशी ते थोडा वेळ बोली लावल्यानंतर चक्कर येऊन पडले आणि त्याची प्रकृती खालावल्याने सर्वांनाच धक्का बसला आणि अस्वस्थही झाले. अशा स्थितीत काही मिनिटांत निवेदक चारू शर्मा त्यांच्या घरातून लगेचच लिलावाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी दोन दिवस लिलावाचा मोर्चा सांभाळला. त्यानंतर ह्यूज लिलावाच्या शेवटच्या फेरीसाठी उपस्थित राहिले. त्यामुळे ह्यूज आणि चारु शर्मा यांच्यावर लिलावाच्या हॉलमध्ये दोघांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

दीपक चहर ठरला सर्वात महागडा गोलंदाज (Deepak Chahar became most expensive bowler) -

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस पडेल असे वाटले होते आणि तसंच झालं. पण दीपक चहरबद्दल कोणालाच अंदाज आला नव्हता, चेन्नई सुपर किंग्सने दीपक चहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. लिलावात विकला गेलेला तो सर्वात महागडा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा -IPL 2022 Mega Auction :आयपीएलमध्ये सहभागी होणारे 'हे' आहेत राजस्थानचे खेळाडू

ABOUT THE AUTHOR

...view details