लंडन - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. लॉर्डस् मैदानात झालेला उभय संघातील सामना भारताने सांघिक खेळाच्या जोरावर 151 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचे पारडे जड होते. पण दुसऱ्या डावात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने चिवट खेळ केला आणि परिणामी इंग्लंडचा पराभव झाला. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने अजूनही भारतीय संघात दोष असल्याचे म्हटलं आहे.
नासिर हुसेनने डेली मेलसाठी कॉलम लिहलं आहे. यात तो म्हणतो, भारतीय संघात अजूनही दोष आहे. इंग्लंडला हेडिंग्लेमध्ये ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. इंग्लंडच्या संघात जोफ्रा ऑर्चर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्राँड असते तर इंग्लंडचा संघ या मालिकेत सहज विजयी झाला असता. पण त्यांच्याशिवाय देखील राहिलेल्या तीन सामन्यात इंग्लंड जिंकू शकतो.
53 वर्षीय हुसेन म्हणाला, जर तो रुट आणि प्रशिक्षक सिल्वरवूडच्या जागेवर असता तर त्याने हेडिंग्ले कसोटीत अनकॅप्ड वेगवान गोलंदाज साकिब महमूदला निवडलं असतं.