भोपाळ : मध्य प्रदेशचा क्रिकेट संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला ( MP cricket team reaches Ranji final ) आहे. फायनलचा सामना 22 जूनपासून मुंबईविरुद्ध आहे. या संघाचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, या संघाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा गौरव केला ( CM Chouhan Invite MP Team ) जाईल. मुख्यमंत्री चौहान यांनी सोमवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या उपांत्य फेरीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि सांगितले की, कोणतेही काम अशक्य नाही. जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग निर्माण होतोच. तसेच रणजी करंडक क्रिकेटपटूंना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निमंत्रण ( Invitation to players at CM residence ) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशचा संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहोचला आहे. मध्य प्रदेशच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम राहू द्या. उपांत्य फेरीतील विजय हा एक टप्पा आहे, मंजिल नाही. मध्य प्रदेशातील जनता अंतिम सामन्याची वाट पाहत आहे. राज्यातील जनतेच्या वतीने ते संघाचे अभिनंदन करत आहेत.