पार्ल: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (शुक्रवार) पार्ल येथील बोलॅंड पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक नुकतीच पार पडली आहे. सामन्यांची नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा (India won toss and choose bat first) निर्णय घेतला आहे.
आजचा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. कारण पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत आपले स्थान जीवंत ठेवायचे असेल, तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकने महत्वाचे आहे. परंतु भारतीय संघात कोणताही बदल ही करण्यात आलेला नाही. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 31 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित अशी कामगिरी करता आली नव्हती.
मात्र आज त्यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कर्णधार राहुल असणार आहे. केएल राहुलला सुध्दा पहिल्या सामन्यात कर्णधार पदाला साजेशी खेळी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून ही चांगल्या खेळीची आशा भारतीय चाहत्यांना असणार आहे. सामन्याला सुरुवात ठीक भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता होईल.