महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2022, 11:46 AM IST

ETV Bharat / sports

SAvIND 2nd ODI: भारतासमोर वनडे मालिका वाचवण्याचे आव्हान; दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना खेळला (India vs South Africa 2nd Match)जाणार आहे. भारताला पहिल्या विजयाची आशा तर दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्याची ओढ.

India vs South Africa
India vs South Africa

पार्ल: सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेला 19 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. तसेच मालिकेतील पहिल्या सामन्यास दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला 31 धावांनी धूळ चारली (Indian team lost by 31 runs) आहे. त्यामुळे आज होणारा दुसरा वनडे सामना भारतीय संघाच्या प्रतिष्ठेचा असणार आहे. कारण हा जर दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला तर भारतीय संघाच्या हातून कसोटी मालिकेप्रमाणे वनडे मालिका सुद्धा निघून जाईल. त्यामुळे आज पार्ल येथील बोलॅंड पार्कवर (Boland Park Stadium) होणारा कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. दुसऱ्या वनडे सामन्याला (Second match between India and South Africa) भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे.

भारतीय संघ मागच्या सामन्यातील पराभव विसरुन आज नव्या उमेदीने मैदानात उतरेल. त्याचबरोबर हा सामना जिंकूण वनडे मालिका खिश्यात घालण्याच्या तयारीने उतरेल. भारतीय संघाचा कर्णधार राहुलला या खेळपट्टीचा अंदाज आला असेल, त्यामुळे आज भारतीय संघात आज काही बदल देखील दिसून येतील.

पार्लच्या बोलंड पार्कच्या खेळपट्टीचा (Boland Park pitch) इतिहास-

बोलंड पार्कच्या या मैदानावर एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ 8 वेळा विजयी ठरला आहे. त्याचबरोबर दुसर्‍यांदा फलंदाजी करणारा संघ 5 वेळा विजयी ठरला आहे. तसेच एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संगाच्या विजयाची संभावना अधिक आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात भारत नाणेफेकीचा कौल जिंकू शकला नव्हता. तसेच या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 353/6 अशी आहे. ही धावसंख्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्या सामन्यात नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर सर्वात कमी धावसंख्या 36/10 अशी असून ही धावसंख्या कॅनडा विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात नोंदवली गेली आहे.

वनडे मालिकेतील दोन्ही संघ-

भारत: केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, प्रसिद्ध शरद कृष्ण, कृष्णा, श्रेयस अय्यर. सूर्यकुमार यादव, जयंत यादव. नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका :टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, झुबेर हमझा, मार्को यान्सिन, यानेमन मालन, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, अँडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, रबरेझ शम्सी. व्हॅन डेर दुसैन, काइल वेरेन.

ABOUT THE AUTHOR

...view details