नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक सामना आहे. कारण टीम इंडिया आज 200 वा टी 20 सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा टी20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि तो सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 199 टी 20 सामने खेळले असून त्यांची विजयाची टक्केवारी 66.48 आहे. भारताने एकदा T20 विश्वचषक जिंकला आहे. पाहूया भारताच्या टी 20 च्या काही खास विक्रमांबद्दल.
T20 मध्ये भारताचा विक्रम :भारताने आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात 127 जिंकले आहेत आणि 63 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. T20 मध्ये भारताची विजयाची टक्केवारी 66.48 आहे, जी खूप प्रभावी आहे. यादरम्यान भारताने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक २९ टी-२० सामने खेळले आहेत आणि इंग्लंडविरुद्ध विजयाची टक्केवारी सर्वात कमी आहे.
200 - T20 सामने खेळणारा दुसरा संघ :भारताने आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले असून आजचा वेस्ट इंडिज विरुद्धचा टी-20 सामना हा त्याचा 200 वा टी-20 सामना असेल. यासह टीम इंडिया २०० टी-२० सामने खेळणारा दुसरा संघ बनणार आहे. 223 टी-20 सामने खेळणारा पाकिस्तान हा सर्वाधिक टी-20 खेळणारा संघ आहे.