महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asia Cup 2023 Team India Squad : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, चहल आणि आर. अश्विनला डच्चू - आशिया चषकाला सुरुवात

बीसीसीआयने आज आशिया चषक 2023 साठी 'टीम इंडिया'ची घोषणा केलीय. या संघातून युजवेंद्र चहल आणि आर. अश्विनला डच्चू देण्यात आलाय. 31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होतेय.

भारतीय संघाची घोषणा
भारतीय संघाची घोषणा

By

Published : Aug 21, 2023, 2:12 PM IST

Updated : Aug 21, 2023, 2:35 PM IST

नवी दिल्ली : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. बीसीसीआय निवड समितीने 17 खेळाडूंची या चषकासाठी निवड केलीय. या संघातून युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना डच्चू देण्यात आलाय. दरम्यान टीम इंडिया आशिया चषक जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

ही आहे टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के एल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

या खेळाडूंचा कमबॅक : आशिया कपद्वारे विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांचं संघात कमबॅक झालंय. श्रेयसला गेल्या अनेक महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत होता. तर के एल राहुलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. या दोघांनी एनसीएमध्ये कमबॅकसाठी कठोर परिश्रम घेतले.

भारत आणि पाकिस्तान अ गटात : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचा अ गटात समावेश करण्यात आलाय. तसेच नेपाळच्या संघाचादेखील यात समावेश करण्यात आलाय. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. भारत 2 सप्टेंबरला कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याच मैदानावर त्यांचा दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणारय. सुपर फोर टप्प्यातील सामने 6 सप्टेंबरला लाहोर येथे संबंधित गटातील A1 आणि B2 संघांमधील संघर्षाने सुरू होतील. उर्वरित सामने कोलंबो, श्रीलंकेत होणार असून 17 सप्टेंबरला कोलंबो येथे अंतिम सामना होणार आहे.

कधीपासून सुरु होणार सामने : 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचे सामने होतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगेल. एकदिवसीय 13सामन्यानंतर आशियाचा किंग कोण हे ठरेल. दरम्यान आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असणार आहे.

हेही वाचा-

  1. India Vs Ireland 2nd T20: कर्णधार म्हणून बुमराहनं जिंकली पहिली मालिका; आयसीसीकडून कौतुक
  2. Sunny Deol Ind Vs Pak : भारत-पाक सामन्यासाठी 'तारा सिंग' सज्ज, सनी देओलने केली 'ही' मोठी घोषणा
Last Updated : Aug 21, 2023, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details