हैदराबाद : सध्या महिला विश्वचषक 2022 ( Women's World Cup 2022 ) स्पर्धेतील सोळा सामने पार पडले आहे. यामध्ये भारतीय संघाचे एकूण चार सामने पार पडले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतीय संघाला विजय आणि दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघ चार गुणांसह आयसीसीसच्या महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच आता सेमीफायनल सामन्यात पोहचण्याचा भारतीय संघाचा मार्ग खडतर ( India path is tough ) झाला आहे. त्यामुळे आज आपण भारताला सेमीफायनलपर्यंत पोहचण्यासाठी नक्की समीकरण कसे असणार आहे, ते जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाला बुधवारी (16 मार्च) इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे आता भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. परंतु तरी देखील भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहचू शकतो. भारताचे अजून तीन सामने बाकी ( India have three matches left ) आहेत. ज्यामध्ये भारताला, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा सामना करायाचा आहे. या तिन्ही संघातील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाने या स्पर्धेत एक ही सामना गमावला नाही. त्यामुळे भारतासाठी त्यांचे आव्हान कठीण असणार आहे.
महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत ( Women's World Cup points table ) ऑस्ट्रेलियाचा संघ सलग चार सामने जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे. संघाचे आठ गुण आहेत. त्याचवेळी दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे गुरुवारी (17 मार्च) न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर आठ गुण झाले आहेत. आफ्रिकेने आतापर्यंत सलग चार सामने जिंकले आहेत. भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज चार सामन्यांतून दोन विजयांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या तिन्ही संघांचे चार गुण आहेत, पण भारताची धावगती सर्वोत्तम आहे. हे पाच संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
महिला विश्वचषकाची गुणतालिका सेमीफाइनलचे गणित -
विश्वचषकाचे साखळी सामने (World Cup chain matches ) संपल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या चार स्थानी असलेले संघ उपांत्य फेरीत खेळतील. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि या दोघांचेही उपांत्य फेरीत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित दोन जागांसाठी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?
भारतीय महिला संघाने ( Indian women's team ) जर उर्वरित तीन ही सामने जिंकले, तर भारताचे 10 गुण होतील. असे जर झाले तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचेल.परंतु याची शक्यता खुपच कमी आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे भारतासाठी सोपे असणार नाही. परंतु तरी देखील भारताला बांगलादेश व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकाला पराभूत करावेच लागेल. ज्यामुळे भारतीय संघाचे आठ गुण होतील आणि भारत सेमीफायनलमध्ये पोहचेल.
या संघांमध्ये उपांत्य फेरी होऊ शकते -
- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीचा सामना जवळपास निश्चित आहे.
- पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
- वेस्ट इंडिजने त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने जवळच्या फरकाने जिंकले, पण नंतर दोन सामने मोठ्या फरकाने गमावले.
- विंडीजचे उर्वरित तीन सामने बांगलादेश, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत आहेत.
- कॅरेबियन संघ यातील दोन सामने सहज जिंकून आठ गुण मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान कायम राखू शकतो.
- न्यूझीलंडचे सध्या चार गुण आहेत आणि उर्वरित तीन सामने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तानसोबत आहेत.
- किवी संघ पाकिस्तानविरुद्ध सहज विजय नोंदवू शकतो.
- अशा परिस्थितीत हा संघ इंग्लंडविरुद्ध जिंकला तर इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतच राहील. दुसरीकडे, इंग्लंड जिंकल्यास न्यूझीलंडच्या अडचणी वाढतील आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
बांगलादेशचा रस्ता अवघड तर पाकिस्तान पूर्णपणे बाहेर -
बांगलादेशचा संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ( Semi-final race ) पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. पण त्यांचा मार्ग खूप कठीण आहे. बांगलादेशला त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागतील. मात्र भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे नसेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिज उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा चौथा संघ बनू शकतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत खेळू शकतात.
उर्वरित तीन सामने कधी होणार?
भारतीय महिला संघाचे आता तीन सामने बाकी आहेत. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 मार्चला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 22 मार्चला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. तसेच तिसरा आणि अंतिम सामना 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघासमोर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होईल. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो असा होऊ शकतो, ज्यामध्ये भारतीय संघासाठी विजय आणि नेट रनरेट या दोन्हीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.