लखनौ Team India Black Armband : भारतीय संघ आज (29 ऑक्टोबर) लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आहे. भारतानं विश्वचषकातील आतापर्यंतचं पाचही सामने जिंकले असून या सामन्यात विजयाची दुहेरी हॅट्ट्रिक करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यात टीम इंडिया काळी पट्टी हाताला बांधून मैदानात उतरली आहे.
'या' कारणानं बांधली काळी पट्टी : भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचं नुकतंच निधन झाल्यानं भारतीय क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियानं हाताला काळी पट्टी बांधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या घोषणेमध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) लिहिलं की, "इंग्लंडविरुद्धच्या आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्यात, भारतीय संघ बिशनसिंग बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हाताला काळी पट्टी बाधणार आहे."