कोलकाता :भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघावर 17 धावांनी मात ( India beat West Indies by 17 runs ) केली. त्याचबरोबर या मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. त्याचबरोबर ही मालिका जिकंत भारताने आयसीसीच्यी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या होत्या. तसेच वेस्ट इंडिजला 185 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठाग करताना वेस्ट इंडिज संघ करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 167 धावाच करु शकला. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देत ( India clean sweep to West Indies ) मालिका खिश्यात घातली.