नवी दिल्ली:भारतीय यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटियाने ( Wicket keeper batsman Tania Bhatia ) सोमवारी दावा केला की, लंडनमधील मॅरियट हॉटेलमध्ये महिला संघाच्या मुक्कामादरम्यान रोख रक्कम, कार्ड आणि दागिन्यांसह त्यांचे महत्त्वाचे सामान लुटले ( Taniya Bhatia robbed in London ) गेले. याबाबत तानियाने भारतात परतल्यानंतर ट्विट करुन माहिती दिली. भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 3-0 असा शानदार विजय नोंदवला. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.
तानियाने ट्विटरवर लिहिले की, 'मॅरियट हॉटेल लंडन ( Marriott Hotel London ) मॅडा वेलेच्या व्यवस्थापनामुळे धक्का बसला असून निराशा आली. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू म्हणून माझ्या नुकत्याच वास्तव्यादरम्यान कोणीतरी माझ्या खोलीत प्रवेश केला आणि रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह माझी बॅग चोरीला गेली. त्यामुळे असुरक्षित.' इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ( ECB ) ट्विटर हँडलला टॅग करत तिन आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'या प्रकरणाचा जलद तपास आणि निराकरणाची आशा आहे. ईसीबीच्या पसंतीच्या हॉटेल पार्टनरमध्ये सुरक्षिततेचा अभाव आश्चर्यकारक आहे. तेही दखल घेतील अशी आशा आहे.