जिलॉन्ग :T20 World Cup SL vs NAM: ऑस्ट्रेलियात आजपासून T20 विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात नामिबियाने 2014 च्या चॅम्पियन श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. यासह नामिबियाने श्रीलंकेकडून मागील पराभवाचा बदलाही घेतला. यापूर्वी, नामिबिया आणि श्रीलंका 2021 च्या T20 वर्ल्डमध्ये आमनेसामने आले होते ज्यात श्रीलंकेने त्यांचा सात विकेट्सने पराभव केला होता. Namibia Beats Srilanka
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आणि 19 षटकांत त्यांचा सर्वबाद 108 धावा झाल्या.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 163 धावा केल्या. नामिबियाकडून जॉन फ्रीलिनने 44 धावा केल्या. त्याने 28 चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
नामिबियाने 10 ते 15 षटकांमध्ये तीन विकेट गमावल्या :प्रथम फलंदाजी करताना 15 नंतर नामिबियाची धावसंख्या 95/6 होती. नामिबियाने 10 ते 15 षटकांमध्ये तीन विकेट गमावल्या. कर्णधार गेरहार्ड इरास्मस (20), स्टीफन बार्ड (26) आणि डेव्हिड विसे (0) बाद झाले.